Text Colour :                 Text Size : A-       A+      

आमच्या विषयी

  • महाराष्ट्र राज्याला वस्रोद्योगाचा प्राचीन कालापासून समृध्द वारसा लाभला आहे.
  • कृषी क्षेत्रानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मीती क्षेत्र म्हणजे वस्रोद्योग होय.
  • तिडके समितीच्या शिफारशीनूसार राज्यातील सहकारी हातमाग, यंत्रमाग व सूतगिरण्या यांचेवर नियंत्रणासाठी दि. 2 जानेवारी, 1971 ला स्वतंत्र हातमाग, यंत्रमाग व सहकारी वस्त्रनिर्माण संचालनालयाची स्थापना करण्यात आली.
  • सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, यांच्या शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.क्र.32/टेक्स-2, दि.24.04.2019 अन्वये वस्त्रोद्योग संचालनालयाचे नांव वस्त्रोद्योग आयुक्तालय असे करण्यात आले.
  • वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे मुख्यालय नागपूर येथे असून या अंतर्गत नागपूर, सोलापूर, मुंबई व औरंगाबाद या चार प्रादेशिक कार्यालयाव्दारे राज्यातील हातमाग,यंत्रमाग व सहकारी सूतगिरण्याचे नियंत्रण करुन विविध योजनांचे संनियंत्रण केले जाते