Text Colour :                 Text Size : A-       A+      

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. अजित पवार

  • नाव : श्री. अजित पवार
  • जन्म : २२ जुलै १९५९
  • जन्म ठिकाण : देवळाली - वरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर
  • शिक्षण : बी. कॉम.
  • ज्ञात भाषा : मराठी, हिंदी आणि इंग्रजी
  • व्यवसाय : शेती
  • कौटुंबिक माहिती : विवाहित
  • पत्नीचे नांव : पत्नी सौ. सुनेत्रा अजित पवार
  • अपत्ये : एकूण -२ मुले – कु. पार्थ व कु. जय
  • मतदार संघ : २०१ - बारामती, जिल्हा पुणे
  • धर्म : हिंदु
  • प्रवर्ग : प्रगत
  • कायमचा पत्ता : मु.पो. काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. दूरध्वनी – ०२११२ - २२६००० / २३४२२२
  • पत्र व्यवहाराचा पत्ता : मु.पो. काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
  • मुंबईतील पत्ता : फ्लॅट नं. ९, दुसरा मजला, प्रेमकोर्ट, चर्चेगेट, मुंबई – ४०० ०२०.
  • संपर्क : ९८५००५१२२२
  • छंद आणि विशेष आवड : क्रिकेट, टेनिस व समाजकार्य

परदेश प्रवास

  • अमेरिका, बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड व स्वित्झर्लंड, ब्राझील, इस्त्रायल, मेक्सिको तथा अर्जेंटीना इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.

सन्माननीय सदस्यांनी केलेल्या कार्याचा तपशील

  • विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहे.
  • वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे तसेच रयत शिक्षण संस्था, सातारा या संस्थेवर संचालक म्हणून सध्या कार्यरत आहे.
  • शमहाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – ऑगस्ट २००६ ते १९ ऑगस्ट २०१८ या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – सप्टेंबर २००६ पासून, तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च २०१३ पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
  • महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई या संस्थेवर संचालक म्हणूनही काम केले आहे.
  • महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर २००५ ते मार्च २०१३ व २५ नोव्हेंबर २०१८ पासून पुनश्च अध्यक्ष म्हणून कार्यरत.

याआधी विधानसभा / विधानपरिषद/ लोकसभा / राज्यसभा सदस्य तसेच विधानमंडळ व संसदेच्या समित्यांचे सदस्य / समिती प्रमुख म्हणून केलेले कार्य (कालावधी)

  • लोकसभा सदस्य : जून १९९१ ते सप्टेंबर १९९१.
  • विधानसभा सदस्य : १९९१ ते १९९५, १९९५ ते १९९९, १९९९ ते २००४, २००४ ते २००९, २००९ ते सप्टेंबर २०१४, २०१४ ते २६ सप्टेंबर २०१९, ऑक्टोबर २०१९ मध्ये १,६५,२६५ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवीत फेरनिवड.

राज्य / केंद्र शासनात मंत्री / राज्यमंत्री म्हणून केलेले कार्य (कालावधी)

  • राज्यमंत्री, कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा : जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२
  • राज्यमंत्री, जलसंधारण,ऊर्जा व नियोजन : नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३
  • मंत्री, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन : ऑक्टोबर १९९९ ते जुलै २००४
  • मंत्री, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) : जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४
  • मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता : नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९
  • मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून),ऊर्जा : नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१०
  • उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन, ऊर्जा) : नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२
  • उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन, ऊर्जा) : डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४
  • उपमुख्यमंत्री : २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९
  • उपमुख्यमंत्री : ३० डिसेंबर २०१९ पासून ते आजपर्यंत